Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अन्न सुरक्षा योजना राज्यात डिसेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केलीय.
अन्न सुरक्षा योजना कायद्याचा फायदा राज्यातल्या ६२ टक्के जनतेला होणार आहे. ग्रामीण भागातील ७६ टक्के जनता तर शहरी भागांतील ४५ टक्के जनतेला याचा फायदा होणार आहे. यासाठी दर महिन्याला ३ लाख ८८ मेट्रिक टन धान्य लागणार असून सुमारे ९०० कोटी रुपये खर्च होणार आहे. या काद्यामुळे पिवळे, पांढरे रेशन कार्ड रद्द होणार असून कायद्या अतंर्गत येणाऱ्या लोकांनाच यापुढे धान्य मिळणार आहे. तर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १९ लाख मेट्रिक टनची क्षमता असलेली धान्य कोठारे लागणार आहेत.
आत्तापर्यंत १३.५ लाख मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या गोदामांची उभारणी झाली असल्याचं देशमुख यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 09:31