मुंबईत न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार gang rape on News photographer

मुंबईत न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार

मुंबईत न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईमधील लोअर परळ भागात २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

लोअर परळ येथील शक्तिमील कम्पाऊंड येथे या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एका मॅगझिनसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून काम करते.

पीडित तरुणीला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या तरुणीचा जबाब नोंदवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तरुणी अद्याप जबाब देण्याच्या अवस्थेत नाही.

या प्रकरणी सध्या ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 00:15


comments powered by Disqus