वडिलांनीच केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार, father raped by his three years old girl

वडिलांनीच केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

वडिलांनीच केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
जयपूरमधील नहरगड भागात वडिलांनीच आपल्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नहरगड भागातील गणेश हा मजुरी काम करणाऱ्या व्यक्तीने बुधवारी पहाटे पत्नी घराबाहेर झोपली असताना, आपल्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला फेकून दिले. बुधवारी सकाळी ही मुलगी एका व्यक्तीला जखमी अवस्थेत सापडल्यानंतर तिच्या आईने पोलिसांना माहिती दिली. या मुलीची जे. के. लोन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी गणेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीच्यावरील धोका टळला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 21:02


comments powered by Disqus