मुंबई सेफ नाही तर रेप सिटी - देवेंद्र फडणवीस, Mumbai rape city not safe city - Devendra Fadnavis

मुंबई सेफ नाही तर रेप सिटी - देवेंद्र फडणवीस

मुंबई सेफ नाही तर रेप सिटी - देवेंद्र फडणवीस
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई सेफ सिटी नसून रेप सिटी झाली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी फडणवीस यांची केली आहे.

मुंबईत एका महिला न्यूज फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमलटी आहे. भाजपने सरकारवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी ट्विट केलंय, मुंबई सेफ नाही तर रेप सिटी आहे.

मुंबईतील महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओ जवळील शक्तीमील कंपाऊंडमध्ये या २२वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एका मासिकात फोटोग्राफर म्हणून काम करत आहे. तिला ऑफिसने दिलेले फोटोशूट करण्यासाठी ही तरूणी सायंकाळी सहाच्या सुमारास शक्ती कंपाऊंडमध्ये गेली असता तिच्यावर ४ ते ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. सध्या तिच्यावर जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी पाच जणांवर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना या आरोपींनी त्यांची मग्रुरी मीडिया समोरही सुरूच ठेवली. मीडियाच्या प्रतिनिधींसमोर हे संशयित आरोपी अश्लील हावभाव करत होते.

राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामुहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघालेत. या बलात्काराविषयी माहिती घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा आर आर पाटल यांनी या बाबतीत बोलणं सोईस्कर रित्या टाळलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 23, 2013, 08:58


comments powered by Disqus