Last Updated: Monday, April 22, 2013, 21:04
www.24taas.com, मुंबईधोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे. उद्योजकांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये यासाठी त्यांना सुरक्षा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची भूमिका मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मांडली.
उद्योगपती आणि रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड सुरक्षा व्यवस्था देण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचे पाटील यांनी समर्थन केले. महाराष्ट्र सरकार उद्योजकांचे रक्षण करते ही सरकारची जबाबदारीच आहे. राज्यातल्या राजकारण्यांनाही सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. त्यामुळे धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे अशी पुस्ती पाटील यांनी जोडली. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय दत्तच्या अटकेवर उत्तर देताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोर्टाच्या आदेशानुसार संजय दत्तला अटक करण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले.
First Published: Monday, April 22, 2013, 21:04