"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी, gutthi car dash on to alto, 4 wounded

"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून बाहेर पडलेली गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवर यांच्या बीएमडब्ल्यू कारने एका ऑल्टो कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर खारघरजवळ हा अपघात झाला. सुनील ग्रोवर कामानिमित्त पुण्याला जात असताना हा अपघात घडला. पुण्याकडून वाशीकडे जात असलेल्या अल्टो गाडीला खारघर स्थानकानजीक ग्रोव्हर यांच्या गाडीनं धडक दिली.

या अपघातात अल्टोतील ऋषिराज लोखंडे (३५), श्रीरंग लोखंडे (५५) आणि बाळासाहेब पाटील (३६) हे तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर मेडिसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाला त्यावेळी ग्रोव्हरचा चालक अनिल यादव (२९) हा गाडी चालवत होता. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 7, 2014, 20:10


comments powered by Disqus