Last Updated: Friday, June 14, 2013, 23:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमराठवाडा सोडला तर राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. पावसानं नागपुरकरांना सळो की पळो करुन सोडलंय. नागपुरात आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु होता. सकाळी 10 च्या सुमारास पावसानं वेग घेतला.
संपूर्ण विदर्भात मुसधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वेधशाळेनं कालचं वर्तवली होती. चंद्रपुरातही पावसाने संततधार हजेरी लावलीये. जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात काळे ढग गोळा होत होते. मात्र पाऊस बरसत नव्हता.
गेल्या दोन दिवसांपासून मात्र मुसळधार पावसानं ही कमतरता भरून काढली आहे. तर जळगाव जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाससानं पुन्हा एकदा हजेरी लावलीय. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावलाय. चाळीसगाव, भडगाव तसंच भुसावळ परिसरात पावसाच्या मध्यम तसंच तुरळ सरी बरसल्या.
मुंबईत दिवसभर पाऊस मुंबईत आज दिवसभर पाऊस सुरू होता.....
त्यामुळे संध्याकाळच्या सुमाराला अनेक भागांत पाणी साचलं होतं. परळ भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. प्रचंड पाण्यातून चाकरमान्यांना घराकडे परतावं लागत होतं किंवा रेल्वे स्टेशन गाठावं लागत होतं. पाणी साचल्यामुळे बसेस, टॅक्सीही रस्त्यावर कमी प्रमाणात धावत होत्या.
ठाण्यात मुसळधार पाऊस ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. काल रात्रीपासून शहरात पावसानं पुन्हा जोर धरलाय. सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. शहरातल्या सखल भागात पावसामुळं पाणी साचलंय. पाचपाखाडीत ठाणे मनपाच्या कार्यालयाबाहेरच पावसामुळं तळं साचलय. मनपाचे नालेसफाईचे दावे किती फोल आहेत, हेच यावरुन सिद्ध होतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 14, 2013, 23:21