Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईरत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय.
नातुनगर परिसरातील ६५ घरांवर दरड कोसळण्याचा धोका असल्याने इथल्या नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र नागरिकांनी स्थलांतर करायला विरोध दर्शवलाय. तर दुसरीकडे कोकण रेल्वेलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय.
काल रात्रीपासून संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक ही २-३ तास उशीराने सुरु आहे. एकूणच मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झालंय.
खान्देशात संततधार खान्देशात पावसाची संततधार सुरु आहे.. जळगावसह अमळनेर, धरणगाव, चोपडा, पारोळा तालुक्यात मान्सूनचा पाऊस बरसतोय... आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं कमबॅक केल्यानं बळीराजा सुखावलाय..
पावसामुळं नदीनाले जलमय झाले असून भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे...समाधानकारक पाऊस नसल्याने खरीपाच्या पेरण्यांना अजून सुरुवात झालेली नाही... मात्र सध्या सुरु असलेला पावसामुळं बळीराजाच्या पेरणीच्या आशा वाढल्यात....
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 15, 2013, 21:41