इमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली, JCB Operator still money in dockyard building collapses

इमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली

इमारत कोसळलीः चोरी करणाऱ्या जेसीबी ऑपरेटरची मती ढासळली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकीकडे असं संकट अक्षरशः कोसळलं असताना त्यातही प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला. मदतकार्यावर असलेल्या जेसीबीचा ऑपरेटर पैसे आणि दागिने चोरत होता.. त्यानंतर या नराधमाला तत्काळ पकडण्यात आलं. त्याला पोलीस अधिका-याने कानफटीत मारली.

मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले असले तरी या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय. यात बारा वर्षीय मुलाचा तर दोन महिलेचा समावेश असून १७ जखमी झालेत आहेत. जखमींना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेतील जखमींची नावे

अनिष कदम (१०)
विजय कांबळे
अजय चंदवणकर (४०)
दीपेश कदम (१६)
देवेंद्र राठोड (४७)
ताकीर शेख (२२)
हबीब शेख
हारूण शेख (२२)
पूजा पाटणकर
मयुर दुलेरे
भाग्यश्री कांबळे
दिनेश कुमार
महादेव कांबळे
गणेश गुरव
कविता कांबळे
शाबीर अलम
चेतना झगडे
तर मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नवे जमुना छावडा आणि लिला छावडा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 18:37


comments powered by Disqus