इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलंMumbai building collapse death toll hits 61, End of rescue operations

इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं

इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ६१ वर गेला असून ४८ तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

जखमींचा आकडा ३० वर गेलाय. या प्रकरणी अशोक मेहता या डेकोरेटरला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशोक मेहतानं या इमारीतील काही भाग भाडेतत्वावर घेतला होता आणि या भागात त्यानं अनधिकृतपणे बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आलीये.

या प्रकरणी महापालिकेची सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आलीये. आठवड्याभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 29, 2013, 08:00


comments powered by Disqus