`काळाघोडा फेस्टीव्हल`साठी अवतरली भारतीय सिनेसृष्टी!, kalaghoda 2013

`काळाघोडा फेस्टीव्हल`साठी अवतरली भारतीय सिनेसृष्टी!

`काळाघोडा फेस्टीव्हल`साठी अवतरली भारतीय सिनेसृष्टी!
www.24taas.com, मुंबई

विविध कलांचा संगम असलेला काला घोडा फेस्टिवल शनिवारपासून सुरू होतोय. या फेस्टिवलचं आकर्षण आहे भारतीय सिनेसृष्टीची शंभरी... त्यानिमित्तानं एक खास इन्स्टॉलेशन तयार करण्यात आलंय.

सलमान खान, रेखा, माधुरी दीक्षित या सगळ्यांचे हे कटअवेज सज्ज झालेत ते मुंबईतल्या काळा घोडा फेस्टिवलसाठी... भारतीय सिनेसृष्टीची शंभरी या थीमवर या सगळ्या कलाकृती साकारल्यायत. सिनेसृष्टीची शंभरी साजरी करताना अर्थातच पहिला मान दादासाहेब फाळकेंना... या सगळ्या कलाकृती साकारल्यायत त्या सुमीत पाटील या कलाकारानं... भारतीय सिनेसृष्टीबद्दलचं प्रेम आणि योगदान दर्शवणारे हे सगळे कटावेज काळा घोडा फेस्टिवलची शान वाढवणार आहेत.

या सगळ्या कलाकृती साकारल्यायत लाकडाच्या मदतीनं... दादासाहेब फाळकेंचा पुतळा मात्र ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून साकारण्यात आलाय. तसंच मराठी सिनेसृष्टीतल्या विविध कलाकारांचं दर्शन घडवणारं खास फिल्मचं एक रिळ तयार करण्यात आलंय. हे सगळं प्रत्यक्षात आलं ते वर्षभराच्या मेहनतीनंतर... या सगळ्या कलाकृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी काला घोडा फेस्टिवलला जरुर भेट द्या, आणि एका छान अनुभवाचे साक्षीदार व्हा...

First Published: Friday, February 1, 2013, 13:30


comments powered by Disqus