Last Updated: Sunday, October 13, 2013, 23:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकाही दिवसांपूर्वी मनोहर जोशींनी शिवसेनेच्या नव्या नेतृत्वावर व्यक्त केलेल्या नाराजीचे तीव्र पडसाद आज दसरा मेळाव्यात पाहायला मिळाले. मनोहर जोशींना शिवतीर्थावर पोहोचायला उशीर झाला. तेव्हा शिवसैनिकांनी मनोहर जोशींविरोधात घोषणाबाजी केली. जोशी व्यासपीठावर पोहोचताच शिवसैनिकांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला. जोशींविरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू झाल्यावर मनोहर जोशींवर व्यासपीठ सोडण्याची नामुष्की ओढावली.
मनोहर जोशींच्या वक्तव्यानं शिवसेनेत फायलिन निर्माण झालं होतं. थेट नेतृत्वावर टीका करत पंतानी स्वत:वरच वादळ ओढवून घेतलं. पण या वादळाचा संघटनेवर काहीच परिणाम झाला नाही उलट शिवसैनिकांच्या रोषालाच पंताना सामोर जावं लागल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे शेवटी पंतांना माघार घ्यावी लागली होती.
मनोहर जोशी... शिवसेनेत ज्येष्ठत्व मान्य असलेले हे नेतृत्व सध्या मात्र त्यांच्याच वक्तव्य़ानं वादळात सापडलंय आणि याला कारण ठरलयं ते दादरच्या एका कार्यक्रमातील पंताचं वक्तव्य... ‘बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं’ असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच्या नेतृत्वावरच टीका केली होती. मनोहर जोशी हे खरंतर शिवसेनेच्या स्थापनेपासून सक्रिय असलेले कार्यकर्ते आणि सेनेच्या जहाल मुशीतून घडूनही आक्रमक नसलेलं नेतृत्व... शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पहिल्या फळीचे शिलेदार म्हणूनही जोशीसरांकडे पाहिले जातं. अर्थात या निष्ठेचे फळ त्यांना संघटनेनं वेळोवेळी अग्रक्रमानं दिलं हा इतिहास आहे. १९७६ साली मनोहर जोशींना शिवसेनेनेचं महापौर बनवलं. १९९० ला छगन भुजबळांची दावेदारी असतानाही मनोहर जोशीना विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आलं. १९९५ साली युतीने सत्तासोपान सर केलं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे जोशीसर होते. आणि १९९९ ला केंद्रात युतीची सत्ता येताच जोशीसरांना लोकसभा अध्यक्षपदाची शपथ घ्यायला लावणारे शिवसेनेचंच नेतृत्व होतं.
व्हिडिओ पाहा - *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 13, 2013, 20:12