... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!, SHIVSENA DASARA MELAVA : MANOHAR JOSHI LEFT STAGE

... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!

... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेचा ४८ वा दसरा मेळावा आज मुंबईत शिवाजी पार्कवर साजरा होतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा... यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं... यावेळी त्यांनी जादूटोणाविरोधी विधेयकासोबतच अनेक विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केला.






उद्धव ठाकरे म्हणतात...
* प्रत्येकाने मतदार नोंदणी केलीच पाहिजे- उद्धव
* जोपर्यंत १०० कोटी हिंदू एकत्र येत नाही, तोपर्यंत ओवैसीसारख्याला फास बसणार नाही- उद्धव
* हे नेभळट सरकार घालवणं हे आपलं कर्तव्य आहे- उद्धव
* पुढे सरकणाऱ्या चीनला कोण रोखणार?- उद्धव
* वारकऱ्यांची सहमती मिळाल्यावरच पाठिंबा देणार
* हिंदुंच्या मुळावर उठणाऱ्या वटहुकूमाची होळी करू- उद्धव
* वटहुकूमासाठी सर्वांची संमती घ्या... तरच वटहुकूमाला पाठिंबा देणार...
* जादूटोणाविरोधी कायद्यावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
* उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा उपस्थित केला हिंदुत्वाचा मुद्दा
* आम्ही मुस्लिमविरोधी नाहीत - उद्धव ठाकरे
* हिंदूंना एक आणि मुस्लिमांना दुसरा असा न्याय नको- उद्धव
* उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका... तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, मुस्लिमांचे नाहीत
* निवडणुकांमध्ये धर्मांध प्रचार केल्यापद्धल मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे- उद्धव
* एकच दिवस जगा, पण वाघासारखं जगा- उद्धव
* डॉ. दाभोलकरांचे मारेकरी का अजून पकडले गेले नाहीत- उद्धव
* बाळासाहेबांनंतर हिंदूंचा वाली नाही- उद्धव
* हिंदूंच्या बाजूने बोलणं पाप झालंय- उद्धव
* लोकांना न्याय मिळवून देताना अनेक शिवसैनिकांवर झालेत गुन्हे दाखल... पण, शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे नाहीत- उद्धव ठाकरे
* अनेक क्रिकेट खेळाडुंसोबत शरद पवारांचे फोटो पाहिलेत, कधी शेतकऱ्यांसोबत पाहिलेत का?- उद्धव ठाकरे
* मंत्रिमंडळात सगळे दगडधोंडे बसले आहेत- उद्धव
* शरद पवार ज्या कल्पकतेने मोदी आणि शिवसेनेवर बोलतात, त्या कल्पकतेने आपल्या दिवट्या पुतण्याला का बोलत नाहीत?- उद्धव
* उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा उल्लेख 'माकडं' असा केला
* शरद पवारांना काय म्हणायचं? थकलेला नवरा... सगळीकडे बाशिंग?
उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला...
* जेव्हा नरेंद्र मोदींना सर्वांनी विरोध केला तेव्हा एकाच व्यक्तीने त्यांना पाठिंबा दिला, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे- उद्धव
* शिवसेना नरेंद्र मोदींच्या पाठिशी- उद्धव ठाकरे
* डेसिबल मोजणार की देसी बळ मोजणार?- उद्धव
* मी कुणाच्याही दडपणाखाली नाही- उद्धव
* उद्धव ठाकरेंचा मनोहर जोशींना टोला
* शिवसैनिकांचा ज्या दिवशी माझ्या नेतृत्वावरून विश्वास उडेल, त्यादिवशी मी नेतृत्व सोडेन- उद्धव
* माझ्या भाषणाला शिवसैनिक येतील का अशी शंका आधी होती- उद्धव
* आम्ही रावणाची खरीखुरी लंका जाळणारे शिवसैनिक आहोत- उद्धव
* बाळासाहेबांना दिलेली शपथ पूर्ण करणार- उद्धव
* `त्या` खुर्चीत बसायचा अजूनही धीर होत नाही- उद्धव
* घोषणाबाजीनंतर मनोहर जोशी निघून गेले

... असा होता शिवसेनाप्रमुखांनंतरचा पहिला दसरा मेळावा!

जोशी आले आणि निघून गेले...
* मुंबई : शिवसेनेचा ४८ वा दसरा मेळावा
* शिवसैनिकांची मनोहर जोशींविरोधात घोषणाबाजी
* मनोहर जोशी व्यासपीठावर दाखल
* मनोहर जोशी व्यासपीठावर येताच त्यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी
* मनोहर जोशी व्यासपीठावरून खाली उतरले




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013, 19:59


comments powered by Disqus