`शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग!`, Uddhav Thackeray criticizes Sharad Pawar

`शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग!`

`शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग!`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेच्या ४८ व्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आक्रमकपणे शरद पवार, मुख्यमंत्री तसंच पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टिकेचं लक्ष्य केलं.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींबद्दल उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे उद्गार काढत खिल्ली उडवली होती. याच वक्तव्याचा आज उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवार म्हणजे थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग असे आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवार नरेंद्र मोदी आणि शिवसेनेवर टीका करताना कल्पकता दाखवतात, मात्र याच कल्पकतेने ते आपल्या दिवट्या पुतण्याला का बोलत नाहीत, असा खडा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. शरद पवार हे कृषीमंत्री असले, तरी त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नाही. बैलपोळ्याच्या दिवशीही शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांना शेतकऱ्यांपेक्षा क्रिकेटचीच जास्त काळजी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. शरद पवारांचे क्रिकेट खेळाडूंबरोबर अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, मात्र शेतकऱ्यांसोबत पाहिलेला फोटो तुम्हाला आठवतो का? असा रोखठोक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013, 21:12


comments powered by Disqus