डॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका, MARD doctor`s Sue - Moto petition

डॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका

डॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर,  सू-मोटो याचिका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मार्डच्या संपानंतर सोलापूरच्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मार्डची मागणी केली आहे. सू-मोटो याचिका दाखल करत हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

सोलापुरात डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर आक्रमक झालेल्या मार्डचे निवासी डॉक्टर्स संपावर गेलेत. मारहाण करणा-या पोलिसांचं केवळ निलंबन नव्हे, तर डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं अशी मागणी करत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मार्डनं घेतलाय.

आजच्या दिवसात पोलिसांवर उचित कारवाई न केल्यास शनिवारपासून इंडियन मेडिकल असोसिएशनचे ३५ हजार डॉक्टर्स संपात उतरणार असल्यानं संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मारहाण आणि संपाची स्वतःहून दखल घेत मुंबई हायकोर्टानं सु-मोटो याचिका दाखल केलीये.

आज सकाळी ११ वाजता यावर सुनावणी होणार आहे. कोर्टानं राज्य सरकार, मार्ड तसंच सोलापूरचे पोलीस आयुक्त आणि संबंधित हॉस्पिटलच्या डीनना नोटीसा बजावल्या आहेत. कोर्टाच्या मध्यस्थीमुळे चिघळू घातलेला डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता निर्माण झालीये.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 11:20


comments powered by Disqus