पोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल, police Lash out Mumbai High Court,

पोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल

पोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्टसारखा कायदा असताना एफआयआर दाखल करून घेताना त्यानुसार नोंद का केली नाही. तसंच डॉक्टरना मारहाण करणं हा कायद्याने गुन्हा असतानाही डॉक्टरने पोलिसांवर हात कसा उचलला असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.

पोलीसच जर अशा प्रकारे कायदा हाताता घेत असतील तर कसं होणार असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तर सोलापुरात डॉक्टरला मारहाण करणा-या पोलिसांवर गुन्ह्याची नोंद करून सीआयडी चौकशीचे आदेश गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलेत. आता गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर मार्डनं आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही केलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 3, 2014, 15:14


comments powered by Disqus