मेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?Medha Patkar Joins AAP today?

मेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?

मेधा पाटकरांचा आज ‘आप’ प्रवेश?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करुनच प्रवेश करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्या आप मधील प्रवेशाबाबत बोलणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

दुसरीकडे ‘आप’देखील या संदर्भात बैठक घेऊन मेधा पाटकार यांच्या प्रवेशाबाबत विचारमंथन करतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 08:17


comments powered by Disqus