अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा, MNS agitation in support of Anna Hazare

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जनलोकपालसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीटे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे.

लोकपाल विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकार राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, या विधेयकाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राजकीय रंग प्राप्त होऊ लागले आहेत.

मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेण्याचे निश्चित केले. नांदगावकर राळेगणसिद्धीला रवाना झालेत. याआधी अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली होती. मात्र, अण्णा आपल्या निर्णयावर ठार राहिले आहेत. अण्णांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

खासगी विधेयकाचा आणि चालू आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने लोकपालला आज मुहूर्त मिळतो याबाबत शंका उपस्थित करण्यात येतेय. त्यामुळे हे विधेयक सोमवारी संसदेत मांडलं जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. संसदीय निवड समितीने मंजूर केलेल्या लोकपाल विधेयकातील १३ आणि भाजपच्या दोन अतिरिक्त अशा १५ दुरूस्त्यांसह विधेयक मंजूर करावं, या मागणीवर भाजप ठाम आहे.

सरकार आणि भाजप आपली बाजू जास्त वेळ ताणून धरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. लोकपाल विधेयक सर्वप्रथम १९७७ मध्ये संसदेत सादर झालं होतं. त्यानंतर चार ते पाचवेळा हे विधेयक पुढे ढकलण्यात आलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 11:31


comments powered by Disqus