राज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे, MNS to organizational change

राज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे

राज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नाशिकमधील मनसेतून शिवसेनेत गेलेले नेते हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप पाहता राज ठाकरे यांनी त्याची गंभीर दाखल घेतली असून ते लवकरच नाशिकचा दौराही करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.

आमदार आणि प्रदेश पदाधिकार्यां ना `दत्तक` दिलेल्या जिल्ह्यांचे दौरे करून संभाव्य फेरबदलांची चाचपणी करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. मार्च महिन्यात राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा संपला. त्यानंतर राज्यभरात मनसेची झालेली घोडदौड, जिल्ह्याप्रमाणेच तालुकानिहाय परिस्थितीत, आगामी धोरण व पक्षाची भूमिका याबाबत पदाधिकार्यां शी चर्चा करण्याकरिता मुंबईत बैठक झाली.

जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर ठाकरे यांनी सर्वप्रथम प्रत्येक पदाधिकारी व आमदारांनी घेतलेल्या `दत्तक` जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्याचे आदेश दिले. त्यासाठी पुन्हा जिल्हा दौरे करून त्याचा अहवाल नाशिकमधील पक्षाचे मुख्यालय असलेल्या राजगडावर सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे स्वत: फेरबदलांबाबत निर्णय घेतील, असे एका आमदाराने खासगीत सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 11:15


comments powered by Disqus