मनसे करतंय विकास आराखड्याविषयी जनजागृती MNS on Development plans of Pune

मनसे करतंय विकास आराखड्याविषयी जनजागृती

मनसे करतंय विकास आराखड्याविषयी जनजागृती
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे शहराचा विकास आराखडा महापालिका सभागृहात आला, तेव्हा इतर पक्षांच्या नगरसेवकांबरोबरच मनसेच्या नगरसेवकांनीही अनेक उपसूचना दिल्या. मात्र आता याच मनसेनं विकास आराखड्याविषयी जनजागृती सुरू केलीय.

पुण्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात मनसेच्या वतीने विकास आराखाड्याचं प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे. विकास आराखड्यातली चुकीची आरक्षणे, चुकीच्या गोष्टी यावर नागरिकांकडून जास्तीत जास्त हरकती घेतल्या जाव्यात, यासाठी मनसे प्रयत्नशील आहे.

जुन्या पुण्याच्या बहुचर्चित विकास आराखड्याला अखेर महापालिकेची मंजुरी मिळाली. मात्र सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. या विकास आराखड्यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 20:10


comments powered by Disqus