Last Updated: Wednesday, December 11, 2013, 18:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मोठ्या शहरांतील खोटी सुरक्षितता पुन्हा एकदा उघडी पडलीय... दिवस-रात्र पळणाऱ्या मुंबईमध्ये भरदिवसा एका रिक्षात एका विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रसंग ओढावलाय.
मुलुंडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. चालत्या रिक्षात एका विद्यार्थिनीवर विनयभंग झाला. या मुलीनं प्रतिकार केल्यानंतर तिला अमानुषपणे चालत्या रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आलं. यामुळे मुलगी गंभीर जखमी झालीय. जखमी मुलीला पाहून काही सजग नागरिकांनी आरोपीला घटनास्थळावरच पकडलं. त्यानंतर त्यांनी या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय.
पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 11, 2013, 18:43