Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय. तेव्हा कमीत कमी नोव्हेंबरमध्ये तरी मुंबईकरांना चेंबूर ते वडाळा असा साधारण नऊ किमीचा प्रवास मोनोरेल्वेमधून करता येईल अशी शक्यता आहे.
रखडलेली मोनोरेल सुरु व्हावी, यासाठी जय्यत तयारी ‘एमएमआरडीए’नं गेली काही दिवस करत होती. गेले काही महिने ‘एमएमआरडी’नं मोनोरेल्वेच्या कसून चाचण्या घेतल्या. मोनो रेल्वेचा वेगाच्या विविध चाचण्या, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी लागणार वेळ, चेंबूर ते वडाळा असा पहिल्या टप्प्याचे अंतर कापताना लागणारा वेळ, दोन रेल्वे स्थानकांमध्ये प्रवासासाठी लागणारा वेळ, रेल्वे स्थानकांची बांधणी अशी मोनोरेल्वेची विविध परिक्षणे घेण्यात आली.
अखेर या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून मोनो रेल्वे प्रवासी वाहतूकीसाठीचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सज्ज झालं आहे. आता दोन विविध संस्थातर्फे सुरक्षा चाचण्या घेतल्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्यावर प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 8, 2013, 08:10