Last Updated: Monday, August 26, 2013, 10:48
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमुंबई गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी याआधी आणखी एका महिलेवर गँगरेप केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. मात्र याबद्दलची अद्याप पुष्टी झाली नाहीय.
या पाचही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यातच महिला फोटोग्राफरवरील बलात्कारापूर्वीही दुसऱ्या एका महिलेसोबत गँगरेप केला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. अद्याप याबद्दलची सविस्तर माहिती हाती आलेली नाही.
मात्र या सर्व आरोपींना पहिले घरांवर दरोडा टाकण्याच्या आरोपावरुन अटक झालेली आहे. त्यांच्याविरोधात याआधी लैंगिक गुन्ह्याबाबत तक्रार नोंदवल्या गेली नाही. मुंबई गँगरेप प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.
शिवाय राज्य सरकारनं या लढ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलीय. दरम्यान, मुंबई पोलीस आता त्या मोबाईल फोनचा शोध घेतायेत, ज्यात आरोपींनी या बलात्काराचे फोटो काढलेले आहेत. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 10:47