मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?, Mumbai Metro dream incomplete?

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.

“मेट्रोच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही चाचण्या सध्या सुरू आहेत आणि त्या प्रकल्पासाठी अत्यंत आवश्यकत असल्याने कुठलीही घाई करणे उचित होणार नाही.हा हजारो प्रवाशांच्या जिविताशी संबंधित विषय आहे”, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांना सांगितले. फिकीच्या परिषदेनंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, नवी मुंबई विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला म्हणून २२.५ विकसित भूखंड देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे. हा योग्य मोबदला वाटतो. कारण, हा परिसर विकसित झाल्यानंतर सदर जमिनीची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असेल.

फिकीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात येत्या पाच वर्षांत ३८९ विशाल प्रकल्पांद्वारे ३ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून त्याद्वारे ३.५0 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे. राज्याच्या विकासाला मानवी चेहरा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

उद्योजकांनी राज्याच्या विकासासाठी एकत्र यावे, नवीन संकल्पना मांडाव्यात आणि राज्य शासनाची धोरणे अधिक प्रभावीपणे अमलात येण्यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 15:07


comments powered by Disqus