मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!, mumbai will help state on drought issue

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!
www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला १.५ कोटी जनतेला जुलैपर्यंत पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा असल्याचा दावा महापौरांनी केलाय. पाऊस वेळेवर पडला नाही तरी पाणी टंचाईच्या धर्मसंकटाला तोंड देत दुष्काळग्रस्त भागांना मुंबईतून पाणी पुरवण्यात येईल, अशी महापौरांनी माहिती दिलीय.


मुंबईच्या सहा तलावांमध्ये आजघडीला ४ लाख २४ हजार ६६२ दशलक्ष लिटर पाणी आहे. गेल्या वर्षी २०१२ मध्ये हा पाणीसाठा ४ लाख २३४४ दशलक्ष लिटर होता. या पाणीसाठ्यातील ३० हजार लिटरचे ३० वॅगन रेल्वेनं दुष्काळग्रस्त ग्रामीण भागाला महापालिकेनं पाणी पुरवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, हा पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं रेल्वे वॅगनची सोय केली नसल्यानं मुंबईच्या तलावातलं पाणी दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहचू शकत नसल्याची माहिती महापौर सुनिल प्रभू यांनी दिलीय

First Published: Wednesday, April 10, 2013, 13:25


comments powered by Disqus