Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज आणि उद्या मुंबईत पुन्हा बैठक होत आहे. लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
माढा, अमरावती, हातकणंगले, बीड, बुलढाणा या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. या दोन दिवसांच्या बैठकीत हे उमेदवारही निश्चित होतील असे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीवर एक नजर टाकूया1) मुंबई उत्तर - पूर्व - संजय दिना पाटील
2) ठाणे - संजीव नाईक
3) कल्याण - आनंद परांजपे
4) मावळ - लक्ष्मण जगताप
5) शिरुर - देवदत्त निकम
6) बारामती - सुप्रिया सुळे
7) माढा - विजयसिंह मोहीते-पाटील
8) सातारा - उदयनराजे भोसले
9) हातकणंगले - ?
10) कोल्हापूर - धनंजय महाडिक
11) नाशिक - छगन भुजबळ
12) दिंडोरी - ए. टी. पवार
13) नगर - राजीव राजळे
14) रावेर - अरुण गुजराथी
15) जळगाव - सतीश पाटील
16) हिंगोली - सूर्यकांता पाटील
17) परभणी - विजय भांबळे
18) बीड - जयदत्त क्षीरसागर / सुरेश धस
19) उस्मानाबाद - डॉ. पद्मसिंह पाटील
20) बुलढाणा - राजेंद्र शिंगणे / रेखाताई खेडेकर
21) भंडारा-गोंदिया - प्रफुल पटेल
22) अमरावती - गणपत देवपारे / दिनेश बुब
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 22, 2014, 15:51