Last Updated: Saturday, October 20, 2012, 08:48
www.24taas.com, मुंबईआर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.
शुक्रवारी बेस्ट समितीची बैठक झाली यावेळी निधी नसल्यास मुंबईकरांना दिवाळीत जादा वीज पुरवणेही अशक्य असल्याचं सांगण्यात आलं. बेस्टला 12 टक्के दराने पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आला. बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी विस्कटलेली असून खासगी संस्थांकडून चढ्या दरानेही कर्ज मिळणं कठीण झालंय. त्यामुळे हा प्रस्ताव पुढील आठवड्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येणारय.
दुसरीकडे बेस्ट उपक्रम हा महापालिकेचाच भाग असल्यानं एवढा व्याजदर ठेवणं योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. येत्या 22 ऑक्टोबरला या मुद्यावर चर्चा होणार आहे.
First Published: Saturday, October 20, 2012, 08:48