अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी, one more accident on mumbai pune high way, 2 artist injured

अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी

अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी
www.24taas.com, लोणावळा

मुंबई-पुणे हायवेवर पुन्हा अपघात झालाय. यात अभिनेते भालचंद्र कदम आणि अभय राणे जखमी झाले आहेत. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

सोमवारी पहाटे पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच रात्री उशीरा पुन्हा एकदा याच ठिकाणी आणखी एका कारला अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात गाडीमधील सर्वजण सुखरुप बचावले. या गाडीमध्ये ‘फू बाई फू’ फेम विनोदी कलाकार भालचंद्र कदम, अभय राणे व उमेश शिंदे यांचा समावेश आहे. हे तिघेही जन महेश मांजरेकर यांच्या ‘कोकणस्थ’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी मुंबईहून पुण्याला येत होते.

लोणावळयापासून पुढे असलेल्या कामशेत बोगद्यानजीक त्यांच्या कारचा टायर फुटल्यानं ही कार रोडच्या बाजुला असलेल्या खड़डयामध्ये पलटली. यामध्ये दोघं जण किरकोळ जखमी झाले. त्यांना निगडी येथील लोकमान्य हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभय राणे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटलंय.

याच ठिकाणी मागील महिन्यात २४ डिसेंबरला अभिनेते आंनद अभ्यं कर व अक्षय पेंडसे यांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते.

First Published: Tuesday, January 29, 2013, 08:59


comments powered by Disqus