Last Updated: Friday, August 17, 2012, 16:36
www.24taas.com, मुंबईमुंबईत राहणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातल्या नागरिकांनीही अफवांचा धसका घेतलाय. मुंबईतूनही पूर्वोत्तर राज्यांतल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्थलांतर सुरु केलं आहे.
आज पहाटे मुंबईहून गुवाहटी आणि पश्चिम बंगाकडं जाणाऱ्या गाड्यांना नागरिकांची तुफान गर्दी होती. लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला आणि सीएसटी स्थानकात रात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या लोकांना धीर देण्याचं कार्य करत आहेत.
या गाड्य़ांमध्ये पूर्वोत्तरेतील नागरिक मिळेल तशी जागा पकडून जात होते. नागरिकांमध्ये असलेली भीतीचं वातावरण कायम आहे हे त्यांच्या देहबोलीवरुन तरी जाणवत होते. मुंबई आणि उपनगरातील कल्याण, कसारा, इगतपूरी स्टेशनवरही पूर्वोत्तरेतील नागरिकांची गर्दी असल्याचं दिसतंय.
First Published: Friday, August 17, 2012, 09:08