सेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!, sena objection on sachin tendulkar name for kandivali ground

सेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!

सेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण मिळालंय. सचिनचं नाव देण्याची घोषणा ‘एमसीए’ अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली तर हा पालिकेचा भूखंड असल्यानं हा अधिकार महापालिकेचाच असल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं सांगून प्रकरणाला नवं वळण दिलंय.

या राजकीय कुरघोडीत नामकरणाचा हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. यापूर्वी शिवसेनेनं या संकुलाला सुनील गावसकरांचं नाव देण्याची मागणी उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केली होती. मात्र आता सचिन तेंडुलकरचं नाव देण्यावरून हा राजकीय वाद रंगण्याची चिन्ह आहे.

‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ला म्हणजेच ‘एमसीए’ला कांदिवली संकुलासाठी दिलेला भूखंड हा मुंबई महापालिकेनं दिलाय. त्यामुळं त्या संकुलाचं नामकरण करण्याचा अधिकार हा मुंबई महापालिकेचा आहे... एमसीएचा नाही’ अशी भूमिका महापालिकेचे सभागृह नेता यशोधर फणसे यांनी मांडलीय.

फणसे यांनी महापौर सुनील प्रभू यांना तसं पत्रही लिहीलंय. फणसे यांनी सचिन तेंडुलकरच्या नावाला उघड उघड आक्षेप घेतला नसला तरी कांदीवली संकुलाला सचिनचं नाव देण्याविषयी त्यांनी उघडपणे हरकत घेतलीय. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या भुखंडावरच्या कोणत्याही वास्तूला कोणाचं नाव द्यायचं हा अधिकार पालिकेचा आहे, अशी भूमिका फणसे यांची मांडलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 18:38


comments powered by Disqus