Last Updated: Tuesday, October 22, 2013, 22:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई निवृत्त झाल्यानंतर राजकारणात शिरून काय काम करायचं? याचा निर्णय सचिनच घेईल, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिनतर्फे बॅटींग केलीय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार याबाबत चर्चांना उधाण आलंय. त्यावर राज्यसभेत काँग्रेसचं मानद खासदारकी मिळालेला सचिन भविष्यात काँग्रेसचा स्टार प्रचारकही होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यात राजकारणात काय करायचे याचा निर्णय स्वत: सचिनचं घेईल असं सांगत सचिनच्या रिटायरमेंटनंतरच्या चर्चांना फूलस्टॉप लगावलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 22, 2013, 22:28