Last Updated: Tuesday, October 22, 2013, 14:39
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडे स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात येतेय. सचिनला फेअरवेल गिफ्ट म्हणून एमसीए त्याला एक पोट्रेट भेट देणार आहे. त्याचप्रमाणे कांदीवलीच्या क्लबला सचिन तेंडुलकर जिमखाना असं नावही देण्यात येणार आहे.
वानखेडे स्टेडियमच्या बाजूला त्याच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे कटावेज लावण्यात येणार आहे. अखेरच्या टेस्टसाठीच्या एका दिवसाचं तिकीट हे 250 रुपये असेल. तर पाच दिवसांचं तिकीट हे एक हजार रुपये असणार आहे.
या तिकीटावर सचिनचा फोटो आणि त्याच्या 51 व्या टेस्ट सेंच्युरीचा स्कोअर या तिकीटांवर असेल. सचिननं एमसीएकडे 500 तिकीटांची मागणी केली होती. आणि एमसीएनं त्याची ही मागणी मान्यही केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 22, 2013, 14:39