मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!, sharad pawar on balasaheb memorial

मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!

मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीची निवड करताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट केलाय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी पुढाकार घेतलाय. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भातील समितीवर सर्वच पक्षियांनी आणि इतर मान्यवरांनी एकत्र येण्यासाठी आता पवारांनीच प्रयत्न सुरू केलेत. यावेळी काँग्रेसमधील मान्यवरांची निवड करताना पवारांनी मुख्यमंत्र्यांऐवजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंचं नाव सुचवलंय. इतकंच नाही तर सुशिलकुमार शिंदेंना फोन लावून याबाबत त्यांच्याकडे साकडंही घातलं.

लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, चित्रकार रवी परांजपे यांचाही उल्लेख शरद पवारांनी समितीमध्ये केल्यानं शिवसेनेच्या मुखपत्र अर्थात सामनामध्ये पवारांची वारेमाप स्तुती करण्यात आलीय.

व्हिडिओ पाहा :-


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 21:06


comments powered by Disqus