Last Updated: Wednesday, December 12, 2012, 20:27
www.24taas.com, मुंबईशिवाजी पार्कच्या नामांतरावरून शिवसेनेनं अखेर माघार घेतलीय. शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांच्या सृमीस्थळाला शिवतीर्थ नाव देण्याची नवी मागणी आता शिवेसेनेनं केली आहे. याबाबत महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी माहिती दिलीय.
मात्र आता या नव्या मागणीमुळं बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या जागेवर उभारण्यात आलेल्या चौथ-याचा वाद मात्र कायम राहणार असल्याचं दिसतंय. सुरूवातीला शिवाजी पार्कच्या नामांतराची मागणी शिवेसनेनं केली होती. त्याबाबतचा महापालिकेत ठरावही आणणार असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं होते.
मात्र या प्रस्तावाला काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसेनंही तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळं नामांतराच्या मुद्यावर शिवसेना एकाकी पडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आणखी नामुष्की ओढवू नये यासाठी शिवेसेनेनं भूमिका बदलल्याचं बोललं जातंय.
First Published: Wednesday, December 12, 2012, 20:11