Last Updated: Wednesday, April 3, 2013, 18:22
www.24taas.com, मुंबईआयपीएलचे होर्डिंग्ज दिसण्यासाठी बीएमसीच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं चक्क झाडांच्या फांद्या तोडल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.
वरळी नाक्याशेजारी हाजी अलीकडं जाणा-या रोडच्या कडेला आयपीएलचे भलंमोठं होर्डिंग लावण्यात आलंय. परंतु हे होर्डिंग दिसण्यात झाडांचा येणारा अडथळा दूर करण्यासाठी झाडांच्या सगळ्याच फांद्या छाटण्यात आल्यात. विशेष म्हणजे स्थानिकांनी कुठलीही तक्रार केलेली नसताना बीएमसीनं हा प्रताप केला.
त्यामुळं स्थानिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय. तसंच वरळी पोलीस स्टेशनमध्ये मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
First Published: Wednesday, April 3, 2013, 18:22