Last Updated: Saturday, December 3, 2011, 15:13
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईत पाण्याची समस्या ही वर्षातून अनेक वेळा डोकावते. पालिका पाणी पुरवठ्यात बिल्डर लॉबीला झुकतं माप देत असा आरोप अनेक वेळा दिसून आलंय. मुंबईचे करी रोड, लोअर परेल अशी काही भागात बिल्डर मुळे कमी पाणी पुरवठा रहिवाश्यांना होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मुंबईत पाण्याची समस्या ही वर्षातून अनेक वेळा डोकावते. पालिका पाणी पुरवठ्यात बिल्डर लॉबीला झुकतं माप देत असा आरोप अनेक वेळा दिसून आलंय. मुंबईचे करी रोड, लोअर परेल अशी काही भागात बिल्डर मुळे कमी पाणी पुरवठा रहिवाश्यांना होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.
गेली अनेक वर्षयाभागात पाण्य़ाची अडचण होती. मुख्य म्हणजे या भागाचे नगरसेवक भाजपचे चंद्रकांत पुगावकर गेली 10 वर्षे आहेत. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या भागात लोढा बिल्डरचं काम सुरु झाल्यापासूनच पाण्य़ाचं व्यवस्थित कनेक्शन रहिवाश्यांना मिळालं. बिल्डरांमुळे का होईना हक्काचं पाणी मिळालं खर... मात्र पाणी येण्याची वेळ पहाटे 4.30 ते 5.00. त्यावेळेतही काही वेळापुरतं पाण्याला वेग असतो. मात्र नंतर पाण्याची अशी संतंतधार सुरु होते. चाळीत राहणारे रहिवाशी कसे काय इतक्या भांड्यात पाणी साचून ठेवणार.. पालिका जनतेपेक्षा बिल्डरांची काळजी जास्त घेते हेच यावरुन स्पष्ट होतं.
First Published: Saturday, December 3, 2011, 15:13