Last Updated: Friday, June 22, 2012, 10:37
www.24taas.com, मुंबई मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतरही सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्याचं केबिन सुरक्षित असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलयं. मुख्यमंत्र्यांच्या केबिन या आगीची काहीच झळ पोहचली नसल्यानं असं वक्तव्य करून एक प्रकारे दादांनी बाबांकडेच बोट दाखवलंय.
मंत्रालयात लागलेल्या आगीत पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील कार्यालयं भस्मसात झाली मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या केबिनमधल्या नोटपॅडलाही धक्का लागला नाही, असं म्हणत अजित पवारांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. उपमुख्यमंत्री असं म्हणत असले तरी काही बोटं त्यांच्याकडेही उठलेली आहेत. मंत्रालयात आग लागल्यावर सुरक्षा यंत्रणांनी सामान्यांना सामान्यांसारखीच वागणूक दिल्याचा क्लेशदायक प्रकार घडल्याचाही आरोप या आगीची झळ पोहचलेल्या काही लोकांनी केलाय. आग लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाहेर पडण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र त्यांच्याच केबिनमध्ये असलेल्यांना अशी कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती.
पावसाळी अधिवेशन पुढे ढकलणार?दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज वेळात मंत्रालय आणि कंट्रोल रुममध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. मंत्रालयातल्या गुरुवारच्या अग्नितांडवानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी ११ वाजता विशेष कॅबिनेट बैठक विधानभवनात बोलावलीय. या बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. अग्नितांडवामुळं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं जाण्याची शक्यता आहे.
.
First Published: Friday, June 22, 2012, 10:37