परवेझ टाक आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात - Marathi News 24taas.com

परवेझ टाक आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात

www.24taas.com, मुंबई
 
अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणाताला प्रमुख आरोपी परवेझ टाकला काल रात्री मुंबईत आणण्यात आलं. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा परवेझवर आरोप आहे. हत्येचा कबुलीजबाबही परवेझ टाकनं काश्मिर पोलिसांना दिला होता.
 
मुंबई पोलिसांनी परवेझच्या चौकशीसाठी परवेझला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परवेझला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून आज त्याला किला कोर्टात हजर केलं जाणर आहे. अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याचा जबाब नोंदवणार आहेत.
 
लैला लष्कर-ए-तोएबाचा आतंकवादी परवेझ इकबाल टाक याच्या संपर्कात होती. दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये लैलाचंही नाव संशयितांमध्ये आहे. मुंबईतल्या काही जागांची माहिती काढून ती लष्कर-ए-तोएबाला देण्यासाठीच लैला आपल्या कुटुंबासहित मुंबईला आली होती, असं भारतीय गुप्तचर संस्थांचं म्हणणं आहे.

First Published: Monday, July 9, 2012, 10:52


comments powered by Disqus