अनैतिक संबंधातून लैलासह कुटुंबियांची हत्या

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 17:54

लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.

अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:23

अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.

परवेझ टाकने जबाब फिरवला

Last Updated: Monday, July 9, 2012, 12:34

लैला खान हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या सध्या ताब्यात असलेल्या परवेझ टाकनं जबाब बदलत खळबळजनक खुलासा केलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची इगतपुरीतल्या बंगल्यात हत्या केल्याचा दावा परवेझ टाकनं केलाय.

परवेझ टाक आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Monday, July 9, 2012, 10:52

अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणाताला प्रमुख आरोपी परवेझ टाकला काल रात्री मुंबईत आणण्यात आलं. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा परवेझवर आरोप आहे. हत्येचा कबुलीजबाबही परवेझ टाकनं काश्मिर पोलिसांना दिला होता.