परवेझ टाकने जबाब फिरवला - Marathi News 24taas.com

परवेझ टाकने जबाब फिरवला

www.24taas.com, मुंबई
 
लैला खान हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या सध्या ताब्यात असलेल्या परवेझ टाकनं जबाब बदलत खळबळजनक खुलासा केलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची इगतपुरीतल्या बंगल्यात हत्या केल्याचा दावा परवेझ टाकनं केलाय.
 
जम्मू काश्मीर पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यानं लैला खान आणि तिचे बहिण भाऊ आणि आईची इगतपुरीत हत्या केल्याचं म्हटलय. इगतपूरीच्या बंगल्याचा वॉचमन शकीर याच्या मदतीनं सगळ्यांची हत्या केली. सगळ्यांचे मृतदेह आसपासच्या परीसरात गाडून टाकले आहेत. याआधी परवेझने लैला खानची हत्या गोळी झाडून केल्याचा जबाब दिला होता. शिवाय त्यांचा मृतदेह मुंबईच्या आसपासच्या जंगलात फेकून देण्यात आला होता असं सांगितलं होतं.
 
परवेझ वारंवार आपला जवाब बदलत आहे. क्राइम ब्रांचने आता परवेझचा ताबा घेतला आहे. जोपर्यंत लैला खान आणि तीच्या कुटूंबीयांचा मृतदेह मिळत नाही तोपर्यंत परवेझच्या कोणत्याही जवाबावर आम्ही विश्वास ठेवणार नाही असं क्राईम ब्रँचचं म्हणणं आहे. परवेझला आज किला कोर्टात हजर केलं असता त्याला 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published: Monday, July 9, 2012, 12:34


comments powered by Disqus