‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके? - Marathi News 24taas.com

‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके?

www.24taas.com, मुंबई
 
अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या आगीच्या मुद्यावर सरकारची अग्निपरीक्षा झाली. मात्र, आजपासून सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
 
राज्यातली दुष्काळाची स्थिती आणि लांबलेला पाऊस यामुळे निर्माण झालेल्या संकटावर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. राज्यात दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. अनेक भागात अजूनही पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने ही स्थिती गंभीर बनली आहे. त्यातच अनेक भागात खरीपाच्या पेरण्याही  रखडल्या आहेत. त्यामुळं दुष्काळाची दाहकता अजूनही कायम आहे. यावर  काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळं आगीनंतर आता सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागतील अशी चिन्ह आहेत.

First Published: Wednesday, July 11, 2012, 10:35


comments powered by Disqus