Last Updated: Thursday, December 15, 2011, 11:28
झी २४ तास वेब टीम, मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदूमिलची

केवळ ४ एकर जागा देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात आज रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. स्मारकासाठी मिलची सर्व १२ एकर जागा द्या अशी मागणी करत आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी आज इंदू मिलवर चाल करत भिंतीवर हातोड्याचे घाव घातले.
इंदू मिलच्या जागेबाबतचा वाद चांगलाच चिघळला आहे, इंदू मिलच्या आवारात जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली, इंदू मिलचा दरवाजा तोडून रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ते आत घुसले. आधी भिंतीवर हातोड्याचे घाव, नंतर मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू केली. इंदू मिलच्या जागेसाठी RPI आक्रमक झाली. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १२ एकरची मागणी केली गेली असता, सरकारने फक्त ४ एकर जागा दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
दुसरीकडे चेंबुरमध्येही आरपीआय़ कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी इंदूमिलचा ताबा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता. त्यानंतर आज रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा चैत्यभूमी ते इंदुमिल यादरम्यान काढण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा झुगारून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते इंदू मिलजवळ आले आणि हातोड्याचे घाव घातले.
First Published: Thursday, December 15, 2011, 11:28