Last Updated: Friday, July 20, 2012, 18:48
www.24taas.com, मुंबई पश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.
मोटरमनच्या सामूहिक सुट्टीचा फटका मात्र प्रवाशांच्या खिशाला बसतोय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपला मनमानी कारभार सुरू केलाय. अडकलेल्या प्रवाशांकडून ज्यादा पैशांची मागणी करण्यात येतेय. ज्या प्रवाशांना ही मागणी परवडण्यासारखी वाटतेय ते प्रवासीच टॅक्सी आणि रिक्षात बसू शकतात. पण, इतरांना मात्र टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मागणीला काय उत्तर द्यावं, हे कळत नाहीय. मोटरमननं आपल्या अधिकारांसाठी प्रवाशांना वेठीस धरलंय, मोटरमन आपला अधिकारांची मागणी करतायत पण आमच्यासाठी मात्र कुठलाच अधिकार नाही, अशी हतबल भावना या प्रवाशांनी बोलून दाखवलीय.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एव्हाना जाम झालाय. मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब दिसत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशी किती वेळात आपल्याला हव्या त्या स्थानावर पोहचतील याचा मात्र नेम नाही.
.
First Published: Friday, July 20, 2012, 18:48