ब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 22:38

तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.

भारतीय वंशांच्या मीरा जोशी बनल्या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ

Last Updated: Sunday, April 13, 2014, 14:26

भारतीय वंशांच्या मीरा जोशी या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ बनल्या आहेत. शुक्रवारी न्यूयॉर्क सिटी काऊंसिलमध्ये मीरा यांच्या समर्थनार्थ ४६ मतं पडली. आता मीरा न्यूयॉर्क सिटी टॅक्सी अॅण्ड लेमोजिन कमिशन (टीएलसी)चे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल.

मुंबई बेस्ट बंद, कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघणार

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 15:43

बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.

स्कूल बस रस्त्यावर तरीही मुंबईकरांचे हाल, टॅक्सीकडून लूट

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 12:09

बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.

टॅक्सी बुक करा मोबाईलवर... तेही इंटरनेटशिवाय!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 21:20

वेळी-अवेळी विमान पकडायला जायचंय किंवा असंच कुठेतरी... आयत्या वेळी टॅक्सी कुठून मिळणार? हा प्रश्न सतावत असेल तर डोन्ट वरी...

‘महिला फ्लीट टॅक्सी`साठी परवाने मिळवणं झालं सोप्पं!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 08:29

राज्य शासनानं आखलेल्या ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. या योजनेसाठी महिलांना लिलाव पद्धतीनं परवाने देण्यात येणार आहेत. याविषयी निविदाही (टेन्डर) जारी करण्यात आलीय.

फक्त एक फोन... आणि हवी तिथे पोहचणार `काळी-पिवळी` टॅक्सी!

Last Updated: Monday, December 30, 2013, 13:49

तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय… तुम्ही टॅक्सी मागवण्यासाठी फोन करता आणि कमी खर्चातली ‘काळी-पिवळी’ टॅक्सी तुमच्या सेवेसाठी हजर होते... हा अनुभव आता तुम्हीही घेऊ शकता.

गुगल कंपनीची आता चालकरहित रोबोट टॅक्सी

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:06

आता येणार चालकरहीत टॅक्सी... आश्चर्यचकीत करणारी ही चालकरहित रोबो टॅक्सी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणारी गुगल कंपनी अशी टॅक्सी विकसीत करणार आहे. या टॅक्सीमुळे अपघाताची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्याच्या फायदा होणार आहे, हा मुळ हेतू लक्षात घेऊन गुगल कंपनी ही टॅक्सी तयार करणार आहे.

CNG गॅस महागला! रिक्षा- टॅक्सी भाड्यावर होणार परिणाम!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 23:04

मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या किंमतीत 2 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलाय.

मुंबईतून होणार जुन्या टॅक्सी, रिक्षा बाद

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 19:27

२० वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी आणि १६ वर्षे जुन्या रिक्षा १ ऑगस्ट २०१३ पासून बाद करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणानं घेतलाय.

पर्यटकांनो सावधान! माथेरानमध्ये होतेय लूट

Last Updated: Monday, February 25, 2013, 08:04

थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतं. माथेरानची मिनीट्रेन आणि माथेराननं जपलेलं गावपण ही पर्यटकांची मुख्य आकर्षणं... मात्र आता इथं येणा-या पर्यटकांना टॅक्सीवाल्यांकडून लुबाडण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानला जाणा-या पर्यटकांना आता सावध रहावं लागणार आहे...

रविवारी रिक्षा आणि टॅक्सी बंद

Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:07

उद्या दादार येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर ठेवण्यात येणार आहे. यावेळी सर्व शिवसैनिकांनी सार्वजनिक वाहनांतून वाहतूक करून यावं असं आवाहन करण्यात आलंय. उद्या मुंबईतील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच मुंबईतील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाडेवाढ : कोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी

Last Updated: Saturday, October 13, 2012, 18:50

एक समिती रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कशी काय सुचवू शकते. अशी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. सरकारने एक समिती हकीम समितीच्या सूचनांवर ही भाडेवाढ केली होती.

भाडे नाकारलं तर याद राखा?

Last Updated: Saturday, October 6, 2012, 11:56

टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची यापुढे भाडं नाकारलं अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केलं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गैरवर्तन करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई करणाचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब

Last Updated: Friday, October 5, 2012, 14:13

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.

भाडेवाढ... नाहीतर टॅक्सी बंद...

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 10:52

‘भाडेवाढ लागू करा अन्यथा रविवारपासून टॅक्सी बंद’चा इशारा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी दिलाय.

रिक्षा-टॅक्सी भाडे वाढीचा बोजा

Last Updated: Saturday, September 29, 2012, 15:12

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेतला. रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांची मनमानी सुरू

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:48

पश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.

प्रवाशांची लूट, टॅक्सी-रिक्षावाल्यांनी केली बेछूट

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:14

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागला.

मुंबईतील टॅक्सीवाले जाणार संपावर

Last Updated: Saturday, March 31, 2012, 08:25

मुंबईतील टॅक्सीचालक पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच वाढवण्यात आलेले दर मान्य नाहीत आणि यासंदर्भात निर्णय घेणारी कमिटी नव्याने स्थापन केली जावी अशी टॅक्सीवाल्यांची मागणी आहे. दरम्यान, टॅक्सी युनियनने सरकारला विचार करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे.

मुंबईत टॅक्सी भाड्यात वाढ मध्यरात्रीपासून

Last Updated: Sunday, March 18, 2012, 09:21

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार शहरातील टॅक्सचं किमान भाडं आज मध्यरात्रीपासून एक रूपयानं वाढून 17 रूपये होणार आहे.

मुंबईत टॅक्सी भाड्यात वाढ

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 20:16

मुंबईत टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. टॅक्सीचे किमान भाडे १६ रुपये होते ते आता १७ रुपये करण्यात आले आहेत

मुंबईत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ?

Last Updated: Thursday, March 1, 2012, 12:53

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं एक रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात भाडेवाढीसंदर्भात एक बैठक होतेय. या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा होणार आहे. सीएनजी इंधनाचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय होणार आहे. या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 09:15

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.

देशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 10:35

बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

'स्पेस टॅक्सी’साठी नासा खर्च करणार अब्जावधी!

Last Updated: Monday, September 26, 2011, 16:04

अंतराळ यानांची सेवा संपल्यानंतर आता अमेरिकाला आपल्या अंतराळ यात्रींना अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी रशियावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेचा आता ‘स्पेस टॅक्सी’ बनविण्याचा मनोदय आहे.