आघाडीसाठी बैठीकींच्या फैरीवर फैरी - Marathi News 24taas.com

आघाडीसाठी बैठीकींच्या फैरीवर फैरी

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आघाडीबाबत काहीच ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे गेले अनेक दिवस बैठकींच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे बैठकीत आजच्या बैठकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
आघाडीबाबतच्या चर्चांचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. काँग्रेस नेत्यांची सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही याबाबत चर्चा होते आहे.
 
गुरुदास कामत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पत्र पाठवून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नाही तर मुंबईतही राष्ट्रवादीसह आघाडी नको अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर काँग्रेसकडून आघाडीबाबत अजूनही काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. या बैठकीला गुरुदास कामत, संजय निरूपम, सुरेश शेट्टी, बाबा सिद्धीकी, कृपाशंकर सिंग, बलदेव खोसा, कृष्णा हेगडे आणि माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत.
 
 

First Published: Sunday, January 8, 2012, 17:03


comments powered by Disqus