मुंबईत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ? - Marathi News 24taas.com

मुंबईत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ?

www.24taas.com,  मुंबई
 
 
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं एक रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात भाडेवाढीसंदर्भात एक बैठक होतेय. या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा होणार आहे. सीएनजी इंधनाचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय होणार आहे. या भाडेवाढीमुळे   मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
 
 
इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती
रिक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे सक्तीचे करण्याबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. सार्वजनिक हितापुढे व्यक्तीगत हिताचा विचार करता येणार नसल्याचे सांगत या परिपत्रकाला स्थगिती देण्यास नकार देत न्यायालयाने रिक्षा युनियनला दणका दिला आहे.
 
 
इलेक्ट्रॉनिक मीटर अभ्यासाविना तयार करण्यात आलं असून ते शास्त्रशुद्ध नाही. त्यामुळे त्यात फेरफार करणे शक्य असल्याचा युक्तीवाद करत मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने राज्य सरकारच्या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत ते रद्द करण्याची मागणी केली. मात्र असा फेरफार करणार कोण असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. शिवाय असे फेरफार केले जाणार नसल्याचे आश्वासन न्यायालयाने युनियनकडे मागितलंय. तसंच इलेक्ट्रॉनिक मीटरबाबत करण्यात आलेल्या आरोपांविषयी दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत.

First Published: Thursday, March 1, 2012, 12:53


comments powered by Disqus