धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा! - Marathi News 24taas.com

धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!

www.24taas.com,मुंबई
ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
 
धुळवडीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा, असे आवाहन सर्वत्र केले जात असताना घातक रंगांमुळे बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांनी आज सकाळी धुळवडीला धमाल करण्यास सुरूवात केली मात्र, दुपारी अनेकांची त्वचेवर रंगामुळे जळजळ सुरू झाली.
 
रंगामध्ये रसायन वापरल्यामुळे हा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच सुमारे १०० हून अधिक जणांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

First Published: Thursday, March 8, 2012, 16:11


comments powered by Disqus