Last Updated: Thursday, November 17, 2011, 07:34
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.
काल्हेर आणि कोलशेत दरम्यान पाईपलाईन दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यानं शनिवारी संपर्ण शहरात पन्नास टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर उंचावरील काही भागांमध्ये शंभर टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणा-या कामामुळं पाणीकपात चोवीस तासांसाठी लागू राहणार आहे.
First Published: Thursday, November 17, 2011, 07:34