बसच्या खिडकीला नाही जाळी, मुलाचा गेला बळी - Marathi News 24taas.com

बसच्या खिडकीला नाही जाळी, मुलाचा गेला बळी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. सायनमध्ये अंगावर शहारे आणणाऱ्या या दुर्घटनेत एका ८ वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागलाय.  विराज परमार असं या मुलाचं नाव आहे. स्कूल बसमधून तो घरी चालला होता. त्यावेळी बसमधून बाहेर डोकावत त्यानं आपलं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि त्याचवेळी एका होर्डिंगला त्याची धडक झाली. या घटनेत विराजचा जागीच मृत्यू झाला.
 
या दुर्घटनेनंतर जखमी विराजला हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून बसच्या ड्रायव्हरने मात्र तिथून पळ काढला. बसच्या खिडक्यांना जाळी नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

First Published: Thursday, November 24, 2011, 05:15


comments powered by Disqus