मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीला 'टार्गेट' - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीला 'टार्गेट'

www.24taas.com, मुंबई
 
गेल्या दहा वर्षांत राज्यात सिंचन क्षमता केवळ 0.1 टक्के इतकीच वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलं.
 
जलसंपदा खात्याच्या 10 वर्षांतल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची सूचना करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक झटका दिलाय.
 
1999 पासून अकरा वर्षे जलसंपदा खातं राष्ट्रवादीच्या ताब्यात असून मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचं सुतोवाच करून राष्ट्रवादीला झटका दिल्याचं मानलं जात आहे.
 
आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्यात अडचणी येतात असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

First Published: Friday, May 4, 2012, 16:15


comments powered by Disqus